Sunday, February 16, 2025

Raja Yeshu Aala (राजा येशु आला) MARATHI CHRISTIAN LYRICS

 राजा येशू आला । राजा येशू आला ॥

सैतानाला जिंकायाला, । राजा, येशू आला

घालवुनी पापें । णि दुःखें घोर ॥
पूर्ण शांती द्यावयाला, । राजा येशू आला

आनंदी आनंद । झालों पापमुक्त ॥
मला शुद्ध करायाला, । राजा येशू आला

वधस्त्तंभावरी । प्राण देता झाला ।
जगताचा त्राता झाला, । राजा येशू आला

राजांचा तो राजा । प्रभूंचा तो प्रभु ॥
बोला सारे जयजय बोला, । राजा येशू आला !

No comments: